आमच्या शेतामध्ये कासवं खूप आहेत.    भर कोसळत्या पावसांत साठलेले पाणी काढण्यासाठी बांध तोडतांना चुकून कासवाला पाठीस कुऱ्हाड लागली.😢
कासवास घरी आणले.  वेटर्नरी डॉक्टर त्यादिवशी भेटू शकले नाहीत.
कासवाच्या फोटो वरच डॉक्टरांनी ट्रीटमेंट सांगितली.
गाईच्या तुपात हळद मिक्स करून त्याचा लेप लावला. खाऊ म्हणून त्याला
चिकन खिमा /सुकी मच्छी /पालक पानें घातली.
लेप दिवसातला दोनदा लावला .दोनच दिवसांत  कासव छान फिरायला/जेवा-खायला लागले.
दोन दिवसांनी शेतात, जेथून त्याला आणले त्याच जागेवर नेऊन परत सोडले.
कासव परत तीन दिवसांनी बांधावर दिसले. पाठीवरचा लेप सुकलेला तसाच होता. पण कासव आनंदी दिसले.🙏🙏
🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢

Leave a comment